मुर्दाबादच्या घोषणा कट्टरपंथी व संघाचे लोक देतात- राहुल

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

जमा झालेला सर्व पैसा हा काळा पैसा नाही आणि सर्व काळा पैसा हा रोख स्वरुपात असूच शकत नाही. पंतप्रधान मोदींविरोधात आमची राजकीय लढाई असून आम्ही त्यांचा पराभव करू. मात्र, बदनामी करणार नाही.

जौनपुर - नोटाबंदीचा निर्णय हा भ्रष्टाचार व काळा पैशाविरोधात नसून शेतकरी व गरिबांविरोधात आहे. या सभेत कोणीही मुर्दाबादच्या घोषणा देऊ नये, कारण मुर्दाबादच्या घोषणा कट्टरपंथी व संघाचे लोक देतात, अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जौनपुर येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर जोरदार टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, की जमा झालेला सर्व पैसा हा काळा पैसा नाही आणि सर्व काळा पैसा हा रोख स्वरुपात असूच शकत नाही. पंतप्रधान मोदींविरोधात आमची राजकीय लढाई असून आम्ही त्यांचा पराभव करू. मात्र, बदनामी करणार नाही. मोदींनी देशातील 60 टक्के संपत्ती एक टक्का अतीश्रीमंत नागरिकांच्या हातात दिली. मी मोदींना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत विचारले पण त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. मोदींच्या विमानात बसून श्रीमंत नागरिक परदेशात जातात आणि ते आता गरिबांची खिल्ली उडवतात. 

Web Title: Rahul Gandhi speaks on #DeMonetisation at Jaunpur