मुस्लिमांना मारहाण हा हिंदू धर्म नव्हे : राहुल

सेवाग्राम आश्रमात काँग्रेसचे संघटन शिबिर
rahul gandhi
rahul gandhisakal

वर्धा : हिंदू धर्म म्हणजे शीख किंवा मुस्लिमांना मारहाण करणे नव्हे, हिंदुत्वाचा मात्र तसाच अर्थ होतो, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केला. काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, असे त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना सांगितले.

वर्ध्यातीलच्या सेवाग्राम आश्रम परिसरातील यात्री निवास येथे काँग्रेसचे चार दिवसीय राष्ट्रीय संघटन प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. शिबिराचे उद्धाटन राहुल गांधी यांच्या हस्ते ऑनलइन पद्धतीने झाले. शिबिरात देशभरातून काँग्रेसचे २०० पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थित पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधी म्हणाले,‘‘हिंदू धर्म आणि हिंदुत्व यामध्ये काय फरक आहे? हे दोन्ही एकच आहेत का? त्या एकच संकल्पना असतील तर त्यांना वेगळ्या नावाने का ओळखतात? कारण त्या निश्‍चितच वेगळ्या संकल्पना आहेत. हिंदू धर्म म्हणजे शीख आणि मुस्लिमांना मारहाण करणे, असे आहे का? हिंदुत्वाचा अर्थ मात्र तसाच आहे.’’ देशात काँग्रेस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा दोन विचारधारा आहेत. भाजप आणि संघाची विचारधारा देशात द्वेष पसरवत आहे. त्यामुळे आता विचारधारेची लढाई आवश्यक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

rahul gandhi
"कंगनाचं ते वक्तव्य चुकीचं पण..."; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याचा दावाही त्यांनी केला. ‘काँग्रेसची विचारधारा जुनी आहे. कॉंग्रेसच्या विचारधारेला पाहिले काँग्रेस कार्यकर्ता समजून नागरिकांपर्यंत पोहोचवत होते. मात्र आता ते विसरले गेले आहे. आपली विचारधारा संपूर्ण देशात पोहोचविण्याचे काम काँग्रेसला करायचे आहे,’ अशी दिशाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिली.

अनेक जण परत येतात

‘‘काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता, नेता असो त्यांना प्रशिक्षण बंधनकारक आहे. ३७०, आतंकवाद, राष्ट्रीयतावर जेव्हा चर्चा होते तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. आजकाल काँग्रेसचे लोक भाजप आणि आरएसएसमध्ये जातात. अनेक जण परतही येतात. ‘ते’ समाजाला बदलवत नाही, ते आमचा उपयोग करून घेतात, अशी त्यांची तक्रार असते,’’ असे राहुल गांधी म्हणाले.

rahul gandhi
मि. ५६ इंच घाबरलेत! चीनबाबत परस्परविरोधी दाव्यांवरून राहुल गांधींची टीका

काँग्रेस पक्ष हिंदुत्वावर हल्ले करत आहेत, हे दुर्दैव आहे. सलमान खुर्शीद हे हिंदुत्वाची तुलना बोको हराम आणि इसिसबरोबर करतात, शशी थरुर ‘हिंदू तालिबान’ शब्द वापरतात. दिग्विजय सिंह आणि मणिशंकर अय्यर यांच्यासारखे नेते ‘हिंदू दहशतवाद’ असा शब्द वापरतात. हा केवळ योगायोग नाही. त्यांचे नेते राहुल गांधी हेच इतरांना हिंदुत्वाबद्दल अशी विधाने करण्यास शिकवत आहेत.

- संबित पात्रा, भाजप प्रवक्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com