प्रज्ञासिंह यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी ठाम

वृत्तसंस्था
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

गोडसेचा देशभक्त म्हणून उल्लेख केला नाही, असे स्पष्टीकरण दिले प्रज्ञासिंह यांनी.

नवी दिल्ली : लोकसभेत वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप खासदार प्रज्ञासिंह यांचा 'दहशतवादी' म्हणून उल्लेख काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राहुल गांधी यांनी प्रज्ञासिंह यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला. त्यांना याबाबत प्रसारमाध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, की होय, मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी जे ट्विट केले. त्यावर मी ठाम आहे. गोडसेही हिंसेचा वापर करत होता आणि प्रज्ञासिंह यादेखील हिंसेचा वापर करत आहेत. प्रज्ञासिंह यांचे हे विधान भारताच्या संसदेच्या इतिहासात एक दु:खद दिवस आहे. 

गोडसेचा देशभक्त म्हणून उल्लेख नाही

नथुराम गोडसेचा देशभक्त म्हणून उल्लेख केला नाही. पण माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते, अशा शब्दात प्रज्ञासिहं यांनी दिलगिरी व्यक्त केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi standby with his statement on pragya thakur