
Video : मै निकला गड्डी लेके! राहुल गांधींची ट्रक सवारी...; ५० किमी केला ड्रायव्हर केबिनमध्ये प्रवास
भारत जोडो यात्रानंतर काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी रात्री मालावाहू ट्रक मधून प्रवास केला. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ते ट्रकमधील केबीनमध्ये बसून प्रवास करताना दिसत आहेत. दरम्यान काँग्रेस पक्षाने काही दिवसांपूर्वीच कर्नाटक विधानसभा निवडणूकीत मोठा विजय मिळवला आहे. राज्यात पक्षाला १३५ जागांवर विजय मिळाला असून कर्नाटकात काँग्रेसचं सरकार स्थापन झालं आहे. या विजयानंतर राहुल गांधी सतत चर्चेत आहेत.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी गे दिल्ली ते शिमला ट्रकने गेले. यादरम्यान त्यांनी अंबाला ते चंदीगड असा प्रवास ट्रकने केला. या प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ सोमवार रात्रीचा असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की ट्रक प्रवासादरम्यान राहुल गांधी यांनी ट्रक चालकांशी संवाद साधला.
हा व्हिडिओ शेअर करत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींचे कौतुक केले आहे. हा व्हिडिओ सोमवारी रात्रीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार , त्यांच्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी वाहनचालकांच्या समस्या जाणून घेण्याचाही प्रयत्न केला.
लवकरच अमेरिका दौऱ्यावर जाणार
काही दिवसांपूर्वी लंडनचा दौरा करून परतलेले राहुल गांधी आता अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते युनिव्हर्सिटी विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. तसचे एका बैठकीत देखील सहभागी होतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार राहुल गांधी हे सन फ्रांसिस्को, वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्क या शहरात जाणार आहेत. येथे ते खासदार आणि थिंक टँकच्या सदस्यांची भेट घेतील. हे कार्यक्रम इंडियन ओव्हरसीज काँग्रेस आयोजित करत आहे.