सत्याग्रह करताना राहुल गांधींनी घेतली आईची काळजी; फोटो झाले व्हायरल

टीम ई-सकाळ
Monday, 23 December 2019

कडाक्याच्या थंडीत केलेल्या या सत्याग्रह आंदोलनातील राहुल आणि सोनिया गांधी यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

नवी दिल्ली : नागरिकत्व कायदा आणि एनआरसीच्या मुद्‌द्‌यावर मुस्लिम संघटना आणि सामाजिक संघटनांच्या आक्रमक आंदोलनानंतर कॉंग्रेसने आज दिल्लीत राजघाट येथे सत्याग्रह केला. काँग्रेसचे दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. कडाक्याच्या थंडीत केलेल्या या सत्याग्रह आंदोलनातील राहुल आणि सोनिया गांधी यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय घडले?
दिल्लीत सध्या प्रचंड थंडी पडली आहे. या थंडीतच आज, काँग्रेसनं राजघाटावर सत्याग्रह आंदोलन केलं. महात्मा गांधींच्या समाधीस्थळी सत्याग्रह करून नागरिकत्व कायद्यावर संघर्षाचा संकल्प काँग्रेसनं जाहीर केला. रामलिला मैदानावरील मोदींच्या सभेमुळे कॉंग्रेसला सत्याग्रहाचे वेळापत्रक एक दिवस पुढे ढकलावे लागले.

Image

Image

आज, थंडीत आंदोलन करताना, सगळ्याच नेत्यांना थंडी वाजत होती. राहुल स्वतः शाल पांघरून सत्याग्रलाहा बसले होते. त्याचवेळी सोनिया गांधी यांना थंडी वाजत असल्याचं लक्षात आल्यानंतर राहुल यांनी आपली शाल आई सोनिया गांधी यांना पांघरली. त्यावेळी उपस्थित मीडियाच्या कॅमेरामननी हे क्षण कॅमेराबद्ध केले. सध्या सोशल मीडियावर राहुल आणि सोनिया यांचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. 

Image

कौतुक आणि ट्रोलिंगही
नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर राहुल यांच्या फोटोंना ट्रोल करण्यात आलं. पण, काहींनी या फोटोंवरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष्य केलंय. राहुल आपल्या आईची काळजी घेतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईला नोटबंदीनंतर नोटा बदलण्यासाठी रांगेत उभं राहायला लावतात, असा टोला एकाने फेसबुकवर लगावलाय. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi takes care of mother sonia gandhi congress protest photo viral