राहुल गांधी कोकेन घेतात

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जुलै 2019

काय म्हणाल्या होत्या कौर

पंजाबची 70 टक्के जनता नशेदार आहे. त्यांची डोपिंग टेस्ट व्हायला हवी. त्यानंतर कळेल कोण नशा करते ते.

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी कोकेन घेतात. पंजाब सरकारकडून घेण्यात येणाऱ्या उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीमध्ये (डोपिंग टेस्ट) ते फेल होतील, असे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आज (शनिवार) सांगितले. केंद्रीय मंत्री हरसिमत कौर बादल यांनी पंजाबच्या जनतेला 'नशेदार' म्हटले होते. त्यानंतर त्यावर बोलताना स्वामी यांनी हे विधान केले. 

पंजाबची जनता अमली पदार्थांचे सेवन करते, असे कौर यांनी म्हटले होते. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची डोपिंग टेस्ट व्हायला हवी असे आदेश दिले होते. याबाबत बोलताना स्वामी म्हणाले, राहुल गांधी कोकेन घेतात. जेव्हा पंजाबमध्ये डोपिंग टेस्ट होईल, यामध्ये ते फेल होतील. 

काय म्हणाल्या होत्या कौर

पंजाबची 70 टक्के जनता नशेदार आहे. त्यांची डोपिंग टेस्ट व्हायला हवी. त्यानंतर कळेल कोण नशा करते ते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhi takes Cocaine says bjp mp subramanian swamy