नांदेडचा पाहुणचार घेऊन राहुल गांधी तेलंगणात

वृत्तसंस्था
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

तेलंगणातील म्हैसा येथे जाहीर सभेसाठी निघालेले कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार राहुल गांधी शनिवारी येथे काही काळ थांबले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची त्यांचे जंगी स्वागत केले. गुरू गोविंदसिंगजी विमानतळावर दीडतास थांबून त्यांनी पाहुणचार घेतला. 

नांदेड- तेलंगणातील म्हैसा येथे जाहीर सभेसाठी निघालेले कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार राहुल गांधी शनिवारी येथे काही काळ थांबले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची त्यांचे जंगी स्वागत केले. गुरू गोविंदसिंगजी विमानतळावर दीडतास थांबून त्यांनी पाहुणचार घेतला. 

तेलंगणातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तेथील मुधोळ मतदारसंघातील म्हैसा येथे खासदार गांधी यांची आज दुपारी जाहीर सभा होती. त्यासाठी ते दिल्लीहून विशेष विमानाने दुपारी साडेबाराला येथे आले होते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, आमदार अमिता चव्हाण आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

चव्हाण यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठी राहुल गांधी दीड तास विमानतळावर थांबले होते. त्यांच्याशी संवादासाठी कॉंग्रेसच्या निवडक दहा पदाधिकाऱ्यांनाच विमानतळातील सभागृहात प्रवेश देण्यात आला होता. विमानतळ परिसरासह शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, दुपारी दोनच्या सुमारास राहुल गांधी हेलिकॉप्टरने म्हैसाकडे रवाना झाले.

Web Title: Rahul Gandhi in Telangana taking Nanded hospitality