भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी ट्रोल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

या ट्विटची खिल्ली उडवत त्यानंतर हे ट्विट भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रिट्विट करत 'आम्ही पण हे ट्विट रिट्विट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही' असे ट्विट केले आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर राहुल गांधी ट्रोल होत आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या जर्मन दौऱ्यावर आहेत. त्यांनी जर्मनच्या संसदेला भेट दिली. तेथील काही फोटो काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत ते संसदेत इकडे-तिकडे बघत आहेत व या ट्विटला 'राहुल गांधी यांचे अनेक पैलू' असे कॅप्शन देण्यात आले आहे. 

या ट्विटची खिल्ली उडवत त्यानंतर हे ट्विट भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रिट्विट करत 'आम्ही पण हे ट्विट रिट्विट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही' असे ट्विट केले आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर राहुल गांधी ट्रोल होत आहेत.

Web Title: rahul gandhi troll on bjp official twitter account