अखेर मोदींना आम्ही गाढ झोपेतून जागे केले : राहुल गांधी

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

राहुल गांधी म्हणाले, की पंतप्रधान आता तीच जीएसटीला लागू करत आहेत, जी काँग्रेसने सुचविली होती. त्याला भाजप ग्रँड स्टुपिड टॅक्स म्हणत होते. नरेंद्रजी उशीर झाला पण चांगले झाले. 

नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने अखेर 'गब्बर सिंह टॅक्स'च्या मुद्द्यावरून गाढ झोपेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जागे केले, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. राहुल गांधी यांनी नुकतेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मोदींना झोपूही देणार नाही, असे राहुल यांनी म्हटले होते. जीएसटीवरून राहुल यांनी सतत गब्बर सिंह टॅक्स म्हणत सरकारवर टीका केलेली केलेली आहे. याच मुद्द्यावरून आता राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.

राहुल गांधी म्हणाले, की पंतप्रधान आता तीच जीएसटीला लागू करत आहेत, जी काँग्रेसने सुचविली होती. त्याला भाजप ग्रँड स्टुपिड टॅक्स म्हणत होते. नरेंद्रजी उशीर झाला पण चांगले झाले. 

Web Title: Rahul Gandhi tweet GST Narendra Modi Gabbar singh tax