राहुल गांधींना झाली वडिलांच्या शिकवणीची आठवण..

वृत्तसंस्था
सोमवार, 21 मे 2018

माझे वडील मला नेहमी सांगायचे की, 'द्वेष करणाऱ्यांची मानसिकता ही कायम बंदिस्त असते.'

- राहुल गांधी 

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 27व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचा मुलगा व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हणले आहे की, माझे वडील मला नेहमी सांगायचे की, 'द्वेष करणाऱ्यांची मानसिकता ही कायम बंदिस्त असते.' 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, मुलगी प्रियांका गांधी व जावई रॉबर्ट वद्रा यांनी दिल्लीतील राजीव गांधी यांचे समाधीस्थळ वीरभूमी येथे जाऊन अभिवादन केले. यापूर्वी त्यांनी ही पोस्ट ट्विटरवर शेअर केली. 

1991 साली राजीव गांधी यांची प्रचारसभेदरम्यान फुटीरतावादी एलटीटीई या संघटनेकडून त्यांची हत्या करण्यात आली होती. आज त्यांचा 27वा स्मृतीदिन आहे. या निमित्त गांधी कुटुंबिय अभिवादन करण्यासाठी वीरभूमीवर गेले होते. त्याचबरोबर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही समाधीस्थळी जाऊन अभिनादन केले.    

Web Title: Rahul Gandhi Tweets Tribute To Rajiv Gandhi My Father Taught Me Hate Is A Prison