बंद करो खोखला भाषण, खाली करो सिंहासन: राहुल गांधी

Rahul Gandhi
Rahul Gandhi

नवी दिल्ली - सिलिंडरच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत खोट्या आश्वसनांची भाषणबाजी बंद करून जनतेची कामे करण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा सत्ता सोडावी, असे म्हटले आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होत असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. ट्विटरवरून राहुल गांधी हे केंद्र सरकार आणि मोदींना सतत लक्ष्य करत आहेत. आजही त्यांनी ट्विट करत मोदींवर सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने टीका केली आहे.

राहुल गांधींनी म्हटले आहे, की सिलिंडर आणि रेशनवरील वस्तुंच्या दरात वाढ झाली आहे. आता खोटी आश्वासने देणारी भाषणे बंद केली पाहिजेत. वाढत्या किंमतीवर अंकुश आणून, युवकांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत. हे जमत नसेल तर त्यांनी सत्ता सोडावी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com