ट्विटरवर जुना व्हिडिओ शेअर करुन राहूल गांधीची मोदींवर टीका

मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव खर्चाने महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता असतानाच, काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. तो व्हिडिओ शेअर करताना त्यांनी आपले नेते अर्थशास्त्र या विषयावर वर्ग घेत आहेत, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपयाने प्रथमच 70 रुपयांची नीचांकी पातळी गाठली. कमुकवत रुपयामुळे चालू खात्याचा समतोल बिघडणार असून आयातीवरील वाढीव खर्चाने महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता असतानाच, काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचा एक जुना व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. तो व्हिडिओ शेअर करताना त्यांनी आपले नेते अर्थशास्त्र या विषयावर वर्ग घेत आहेत, अशा आशयाचे कॅप्शन दिले आहे.

त्याचबरोबर, रुपयाचे अवमूल्यन सातत्याने का होत आहे हे मोदीजी या व्हिडिओमध्ये सांगत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एक प्रकारे त्यांनी अर्थशास्त्र या विषयावर वर्गच घेतल्याचे दिेसून येत आहे. ते तुम्हीही सर्वांनी ऐका ! अशा शब्दात मोदींची राहूल गांधींनी खिल्ली उडवली आहे. 
 

दरम्यान, राहूल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषण आहे. त्यामध्ये त्यांनी रुपयाच्या घसरणीपाठीमागे तत्कालीन सरकार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. रुपयाच्या घसरणीमुळे व्यापार क्षेत्रात भारत टिकणार नाही. आज देशात डॉलरच्या तुलनेत केवळ भारताच्याच रुपयाची घसरण होत चालली आहे, याचे देशाला उत्तर हवंय. असंही मोदींनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. 

या व्हिडिओच्या अनुषंगातूनच राहूल गांधी यांनी प्रश्न केला आहे की, नरेंद्र मोदी हे आज देशाचे पंतप्रधान आहेत तेच आज सरकारमध्ये आहेत तरीही डॉलरच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात रुपयाची घसरण होत आहे, याचे उत्तर आता मोदींनी द्यायला हवे.

Web Title: rahul gandhi uploaded narendra modis old vedio on twitter