राहुल गांधींच्या उ. प्रदेश दौऱ्याची सुरुवात हनुमान दर्शनाने

पीटीआय
सोमवार, 15 जानेवारी 2018

पक्षाच्या माजी अध्यक्षा व राहुल यांच्या आई सोनिया यांच्या रायबरेली मतदारसंघाला भेट देण्यासाठी मकरसंक्रातीचा मुहूर्त निवडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यी हिंदुत्ववादी प्रतिमेसमोर राहुल गांधी यांनी सौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याची रणनिती आखली असल्याचे सांगण्यात आले. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही हा मुद्दा ठळकपणे दिसून आला

रायबरेली - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा उत्तर प्रदेश दौऱ्यास हनुमान मंदिराच्या भेटीने सुरवात झाली. कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर ते प्रथमच उत्तर प्रदेशच्या भेटीसाठी आले आहेत.

लखनौला त्यांचे आगमन झाल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. त्यानंतर अमेठीला जात लखनौ-रायबरेली रस्त्यावरील छुरवा हनुमान मंदिरला भेट घेऊन त्यांनी दर्शन घेतले. पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते राम कुमार यांनी सांगितले की, राहुल गांधी त्यांच्या अमेठी लोकसभा मतदारसंघास नियमितपणे भेट देत असतात, पण मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे.

पक्षाच्या माजी अध्यक्षा व राहुल यांच्या आई सोनिया यांच्या रायबरेली मतदारसंघाला भेट देण्यासाठी मकरसंक्रातीचा मुहूर्त निवडला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यी हिंदुत्ववादी प्रतिमेसमोर राहुल गांधी यांनी सौम्य हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याची रणनिती आखली असल्याचे सांगण्यात आले. गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही हा मुद्दा ठळकपणे दिसून आला.

उत्तर प्रदेश दौऱ्याचा प्रारंभही राहुल यांनी देवर्शनाने केला आहे. हनुमान मंदिरात ते काही मिनिटे थांबले होते. पांढरा कुर्ता-पायजमा अशा वेशभूषेतील राहुल यांनी दर्शनानंतर कपाळावर नामही आवर्जून लावून घेतला.

Web Title: rahul gandhi uttar pradesh congress