Rahul Gandhi Vs Owaisi: राहुल गांधी, ओवैसींच्या वादात अनुराग ठाकुरांची उडी! राहुल गांधींना दिला खास सल्ला

ओवैसींनी राहुल गांधी यांना हैदराबादेतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे.
Anurag Thakur vs Rahul Gandhi
Anurag Thakur vs Rahul Gandhiesakal

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आव्हान स्विकारण्याचा सल्ला दिला आहे. भाजपनं काँग्रेसला अशा प्रकारचा सल्ला दिल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण नेमकं हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊयात. (Rahul Gandhi Vs Asaduddin Owaisi Anurag Thakur jump controversy gives special advice)

नेमकं काय प्रकरण?

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिलं होतं की, त्यांनी वायनाड इथून लढण्याऐवजी माझ्याविरोधात हैदराबादमधून लोकसभा निवडणूक लढवावी. यावर अनुराग ठाकूर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. "राहुल गांधींनी ओवैसींचं आव्हान स्विकारायला हवं, हा दोघांमधील वाद आहे. एकानं आव्हान द्यायचं आणि दुसऱ्यानं स्विकारायचं" असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Anurag Thakur vs Rahul Gandhi
Amruta Fadnavis on Ajit Pawar: अमृता फडणवीसांकडून अजित पवारांचं कौतुक; म्हणाल्या, फडणवीसांचे भाऊ...

ओवैसींनी राहुल गांधींनी आव्हान का दिलं?

ओवैसी हैदराबादमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना म्हणाले की, सर्वात जुन्या पक्षाच्या राजवटीत उत्तर प्रदेशातील बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली. मी तुमच्या नेत्याला (राहुल गांधी) वायनाडमधून नाही तर हैदराबादमधून निवडणूक लढवण्याचं आव्हान देतो. तुम्ही मोठमोठी विधानं करण्याऐवजी मैदानात या आणि माझ्याविरोधात लढा. काँग्रेसचे लोक आता काहीही म्हणतील, पण मी तयार आहे," असंही ओवैसींनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com