राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्ला; भारतीय अर्थव्यवस्थेची श्रीलंकेशी केली तुलना

Rahul Gandhis attack on the central government
Rahul Gandhis attack on the central governmentRahul Gandhis attack on the central government

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अर्थव्यवस्थेवरील ट्विटमध्ये केंद्र सरकारवर हल्ला चढवला आणि भारताची तुलना श्रीलंकेशी (Sri Lanka) केली. ज्यामध्ये बेरोजगारी, इंधनाचे दर आणि जातीय हिंसाचारात दोन्ही देशांचा आलेख जवळपास सारखाच दिसत होता. राहुल गांधींनी पोस्टमध्ये सहा ग्राफिक्स शेअर केले आहेत. ज्यात तीन भारताचे आणि तीन श्रीलंकेचे आहेत. लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवल्याने वस्तुस्थिती बदलणार नाही. भारत श्रीलंकेसारखा दिसतो, असे त्यांनी लिहिले आहे. (Rahul Gandhis attack on the central government)

आलेख २०१७ पासून दोन्ही देशांतील बेरोजगारी दर्शवितो. जी २०२० मध्ये शिखरावर होती. हे वर्ष होते जेव्हा भारताने कोरोनामुळे लॉकडाऊन (Lockdown) लागू केले होते. २०२१ मध्ये बेरोजगारीच्या या परिस्थितीत काही सुधारणा दिसून येईल. दुसरा आलेख भारत आणि श्रीलंकेतील पेट्रोलच्या किमतींची तुलना करतो. या किमती २०१७ पासून वाढत आहेत आणि २०२१ मध्ये शिखरावर आहे. तिसऱ्या आलेखामध्ये दोन्ही देशांतील जातीय हिंसाचार आलेखाद्वारे दाखविण्यात आला आहे. २०२०-२१ मध्ये दोन्ही देशांमध्ये त्याचा आलेख उंचावला आहे.

Rahul Gandhis attack on the central government
लग्नात मिळालेल्या ‘टेडी बिअर’मध्ये स्फोट; तरुणाची प्रकृती चिंताजनक

विशेष म्हणजे शेजारी देश श्रीलंका सध्या अभूतपूर्व आर्थिक संकटाचा (Economic crisis) सामना करीत आहे. सध्या देशात अन्न, वीज आणि इंधनाची तीव्र टंचाई आहे. आर्थिक गैरव्यवस्थापन आणि कोरोना लॉकडाऊनमुळे पर्यटन उद्योग ठप्प झाल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

परिस्थिती इतकी वाईट आहे की श्रीलंका (Sri Lanka) सरकारने बुधवारी सांगितले की पेट्रोलने भरलेले जहाज जवळपास दोन महिन्यांपासून किनाऱ्यावर उभे आहे. परंतु, त्याच्याकडे पैसे देण्यासाठी परकीय चलन नाही. श्रीलंकेने आपल्या नागरिकांना या इंधनासाठी रांगेत उभे राहून वाट पाहू नका असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com