राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर फिल्मी स्टाईलमध्ये आरोप

Rahul Gandhis attack on Prime Minister Narendra Modi in Filmy Style
Rahul Gandhis attack on Prime Minister Narendra Modi in Filmy Style

नवी दिल्ली- काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीनी पंतप्रधान नरेद्र मोदींवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. 'चौकीदार की दाढ़ी में तिनका', असे म्हणत राहुल गांधींनी मोदींवर हल्ला चढवला आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असताना, तेथील एका प्रकल्पाचा उल्लेख करत त्यामध्ये फसवणूक केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे.  

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर फिल्मी स्टाईलमध्ये आरोप केले आहेत. राहुल गांधींना असा दावा केला आहे की, इंफ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनेंशियल सर्विसेज कंपनीला 2007 मध्ये नरेंद्र मोदी यांनी 70 हजार कोटींचे गिफ्ट सिटी नावाचा प्रकल्प दिला. मात्र या प्रकल्पांतर्गत कोणतेही काम झाले नाही, उलट याद्वारे फसवणूकच झाली. हा या स्टोरीचा पहिला सीन आहे. तर, याच कंपनीला 2018 मध्ये LIC-SBI मध्ये लोकांनी लावलेल्या 91 हजार कोटी रुपयांना बेलआऊट करत आहेत, या स्टोरीचा दुसरा सीन असल्याचे त्यांनी सांगितले आहे. असे ट्विट त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केले आहे.
 


दरम्यान, मोदी सरकारने फ्रान्सची कंपनी डेसॉल्टकडून राफेल विमान खरेदी करण्याचा व्यवहार केला आहे. त्याचे मूल्य तत्कालीन यूपीए सरकारने ठरवलेल्या रकमेपेक्षा जास्त असल्याचा दावा राहुल गांधी आणि काँग्रेसकडून गेल्या अनेक महिन्यांपासून केला जात आहे. या व्यवहारामुळे सरकारी खजिन्यातील हजारो कोटी रूपयांचे नुकसान करुन जाणीवपूर्वक काही हेतू सांभाळण्यासाठी मोदींनी व्यवहारात बदल करत हे कंत्राट रिलायंसला दिले असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे. या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही राहुल गांधींकडून मोदी सरकारवर करण्यात आला आहे. अशातच आणखी एक नवा आरोप राहुल गांधींनी मोदींवर केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com