राहुल गांधींची स्पर्धा केजरीवालांशी : भाजप

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गैरव्यवहाराचे आरोप करणारे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी स्पर्धा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गैरव्यवहाराचे आरोप करणारे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी स्पर्धा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नलिन कोहली म्हणाले, "ते आता नवे केजरीवाल होण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कोणतीही खात्री न करता पुराव्याशिवाय अशा प्रकारचे आरोप करत आहेत. या प्रकारच्या राजकारणात सर्वांत वरच्या स्थानी असलेले केजरीवाल यांच्याशी ते स्पर्धा करत आहेत. त्यांना लालूप्रसाद यादव यांचा पाठिंबा मिळत असल्याने ते आनंदी आहेत. जर लालूप्रसाद राहुल गांधींना पाठिंबा देत असतील तर राहुल यांनी त्यावर विचार करायला हवा.'

याशिवाय भाजप नेते संबित पात्रा यांनीही राहुलवर निशाणा साधला आहे. "येथे हे लक्षात घ्यायला हवे की सर्वोच्च न्यायालय हे सर्वांत मोठे आहे आणि राहुल गांधी हे त्यापेक्षा लहान आहेत. राहुल गांधी दाखवत असलेले कागदपत्रे अधिकृत नसल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे. या देशातील नागरिक सुज्ञ आहेत. राहुल गांधी यांचा नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाचा आदर राखायला हवा, हे त्यांना समजते', असे पात्रा यांनी यावेळी सांगितले. राहुल गांधी यांनी मोदींवर सहारा कंपनीकडून 40 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी राहुल यांना पाठिंबा दर्शवित या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Rahul Gandhi's competition with Kejriwal : BJP