पाऊस पडताना विमाने गायब होतील का? : राहुल गांधी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 मे 2019

मोदीजी, भारतात जेव्हा पाऊस पडेल, त्या वेळी रडारवरून आपली सर्व विमाने गायब होतील का?' असा टोमणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारला. ढगांमुळे रडारवरून विमान गायब झाल्याबाबतच्या मोदींच्या विधानाची याला पार्श्‍वभूमी होती. 

निमुच (मध्य प्रदेश) : "मोदीजी, भारतात जेव्हा पाऊस पडेल, त्या वेळी रडारवरून आपली सर्व विमाने गायब होतील का?' असा टोमणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारला. ढगांमुळे रडारवरून विमान गायब झाल्याबाबतच्या मोदींच्या विधानाची याला पार्श्‍वभूमी होती. 

राहुल यांनी आज मध्य प्रदेशमध्ये सभा घेतल्या. येथे त्यांनी केंद्र सरकार आणि मोदींना टीकेचे लक्ष्य केले. मोदीजी, पुढील वेळी भारतात पाऊस पडल्यावर सर्व विमाने रडारमधून गायब होतील का? असा टोमणा मारला. एका मुलाखतीमध्ये मोदींनी लहानपणाच्या त्यांच्या आंब्याबाबतच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्यावरूनही राहुल यांनी मोदींना तिरकस टोला मारला. "मोदीजी, तुम्हीच आम्हाला आंबे खायला शिकविले. आता देशातील बेरोजगार युवकांसाठी तुम्ही काय केले तेही सांगा,' असे राहुल म्हणाले.

कॉंग्रेसच्या "न्याय' योजनेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला वेग येऊन नोटाबंदी आणि जीएसटीमुळे झालेला अन्याय दूर होईल, असा दावा त्यांनी या वेळी केला. "न्याय' योजनेमुळे देशातील गरिबांना दरवर्षी 72 हजार रुपये मिळणार असल्याने बाजारातील उलाढाल वाढेल, ही योजना म्हणजे एक पर्याय नसून आवश्‍यकता आहे आणि या योजनेसाठी लागणारा पैसा अनिल अंबानी, नीरव मोदी यांच्यासारख्या उद्योगपतींकडून येईल, असेही राहुल म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rahul Gandhis Rain and Radar Dig At PM Modi After Balakot Comments