राहुल गांधींचे भाषण देशाचा अपमान करणारे : संबित पात्रा

वृत्तसंस्था
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

भारतातील वाढती बेरोजगारी, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गाला रोजगार मिळाला नाही. मोदी ते देऊ शकले नाहीत. तर दुसरे कोणीतरी उभे राहील, असे उदाहरण दिले. त्यांनी दिलेले उदाहरण अत्यंत चुकीचे आणि आपल्या देशाचा अपमान करणारे आहे.

- संबित पात्रा, भाजपचे प्रवक्ते

नवी दिल्ली : राहुल गांधी यांचे भाषण खोटे आणि देशाचा अपमान करणारे होते. त्यामुळे त्यांनी यावर उत्तर दिले पाहिजे आणि संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज (गुरुवार) केली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी जर्मनीतील हॅमबर्ग येथे केलेल्या भाषणाच्या मुद्यावर पात्रा यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.

हॅमबर्ग येथे असताना राहुल गांधी यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यानंतर भाजपने त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. पात्रा म्हणाले, बुधवारी ज्या मंचावर राहुल गांधी बोलत होते. त्याठिकाणी 23 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तिथे राहुल गांधींनी दहशतवादाचे समर्थन केले. इसिसबाबत जे स्पष्टीकरण देण्यात आले, ते अत्यंत चिंताजनक आणि भीतीदायक आहे. भारतात जी राजकीय स्थिती आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे, असे वक्तव्य तुम्ही केले होते. 

दरम्यान, भारतातील वाढती बेरोजगारी, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गाला रोजगार मिळाला नाही. मोदी ते देऊ शकले नाहीत तर दुसरे कोणीतरी उभे राहील, असे उदाहरण दिले. त्यांनी दिलेले उदाहरण अत्यंत चुकीचे आणि आपल्या देशाचा अपमान करणारे आहे, अशा शब्दांत पात्रा यांनी राहुल गांधींना लक्ष्य केले.  

Web Title: Rahul Gandhis speech is insulting the country says BJPs Sambit Patra