पंधरा लाख विसरा पाच रुपयेसुद्धा मिळणार नाहीत - राहुल गांधी 

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

तुम्हाला भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले असेल. परंतु, तुम्हाला ते पाच रुपयेही देणार नाहीत. त्याचबरोबर मोदीजी हे शेतकऱ्यांच्या मुद्यावर नेहमीच गप्प राहतात, असे राहुल गांधी म्हणाले. मध्यप्रदेशातील मंदसौर येथे गेल्या वर्षी पोलीस गोळीबारात शेतकरी मृत्यूमुखी पडले होते. त्या घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्ताने काँग्रेसकडून आज (ता.8) श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. 

मंदसौर (मध्यप्रदेश) -  तुम्हाला भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले असेल. परंतु, तुम्हाला ते पाच रुपयेही देणार नाहीत. त्याचबरोबर मोदीजी हे शेतकऱ्यांच्या मुद्यावर नेहमीच गप्प राहतात, असे राहुल गांधी म्हणाले. मध्यप्रदेशातील मंदसौर येथे गेल्या वर्षी पोलीस गोळीबारात शेतकरी मृत्यूमुखी पडले होते. त्या घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्ताने काँग्रेसकडून आज (ता.8) श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. त्या सभेला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. 

त्याचबरोबर, मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यावर दहा दिवसात शेतकऱ्यांची कर्जमाफी करु, असे आश्वासनही त्यांनी दिले. आरएसएसवाले देशात द्वेषाचे राजकारण करत आहेत. नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांचे काही ऐकत नाहीत. मी त्यांच्याप्रमाणे 'मन की बात' नाही करणार मी तुमच्या मनाची बात ऐकणार असेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी पोलीस गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी यावेळी त्यांचे सांत्वन केले. 

गेल्या वर्षी आजच्याच दिवशी झालेल्या पोलीस गोळीबारात कन्हैया लाल पाटीदार, सत्यनारायण ठांगर, अभिषेक पाटीदार, बबलू, घनश्याम धाकड़ आणि चिंतामन पाटीदार यांचा मृत्यू झाला होता. या शेतकऱ्यांचे नातेवाईकही या श्रद्धांजली सभेला उपस्थित होते. राज्यात येत्या नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार असून या श्रद्धांजली सभेकडे राजकिय दृष्टिकोनातून बघण्यात येत आहे.

Web Title: rahul says Forget Rs 15 lakh, PM Modi has not given even Rs 5 to anyone