'राहुल पंतप्रधान असते तर अशी परिस्थिती नसती'

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - उरीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर जर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे पंतप्रधान असते तर अशी परिस्थिती आली नसती, अशा प्रतिक्रिया गुजरात प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष भारत सोलंकी यांनी व्यक्त केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना सोलंकी यांनी जम्मू काश्‍मीरमधील पाक पुरस्कृत हल्ल्यांसाठी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जबाबदार ठरवले. तसेच जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर जम्मू काश्‍मीरची परिस्थती एवढी वाईट झाली नसती, असे ते म्हणाले. "उरीमध्ये 18 जवान हुतात्मा झालेले असताना मोदी शांत का?‘, असा प्रश्‍नही सोलंकी यांनी उपस्थित केला. पाकिस्तानमधून बांगलादेश विभक्त होताना 1971 च्या युद्धावेळी इंदिरा गांधी यांनी मोठे धैर्य दाखविल्याचे सांगत "आपल्या देशाला इंदिरा गांधी यांच्यासारख्या नेत्याची आज गरज आहे‘, असेही ते म्हणाले.

उरीच्या हल्ल्यात आतापर्यंत 18 जवान हुतात्मा झालेले आहेत. या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून सरकारने कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: "Rahul is the situation that the Prime Minister had '