राहुल, सोनिया गांधीही 'बेलवाले' : सुब्रमण्यम स्वामी 

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जुलै 2018

''काँग्रेस नेते शशी थरूर सध्या तिहार कारागृहात नाहीत. ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत बसू शकतात. खरे तर तेसुद्धा 'बेलवाले'च (जामीन मिळालेले) आहेत''.

- सुब्रमण्यम स्वामी, भाजप नेते

नवी दिल्ली : ''काँग्रेस नेते शशी थरूर सध्या तिहार कारागृहात नाहीत. ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत बसू शकतात. खरे तर तेसुद्धा 'बेलवाले'च (जामीन मिळालेले) आहेत'', असे भाजपचे नेते खासदार सुब्रमण्यम स्वामींनी सांगितले. तसेच शशी थरूर यांना परदेशात जाण्यास बंदी घालण्यात आल्याने त्यांना परदेशात जाऊन वेगवेगळ्या गर्लफ्रेंड्सना भेटताही येणार नाही, असेही ते म्हणाले.  

दिल्ली पतियाळा हाऊस न्यायालयाने सुनंदा पुष्कर हत्याप्रकरणात शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यांच्या या जामीनावर सुब्रमण्यम स्वामींनी टीका केली. ते म्हणाले, ''काँग्रेस नेते शशी थरूर सध्या तिहार कारागृहात नाहीत. ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत बसू शकतात. खरे तर तेसुद्धा 'बेलवाले'च (जामीन मिळालेले) आहेत. शशी थरूर यांना परदेशात जाण्यास न्यायालयाने बंदी घालण्यात आल्याने त्यांना परदेशात जाऊन वेगवेगळ्या गर्लफ्रेंड्सना भेटता येणार नाही''.  

दरम्यान, न्यायालयाकडून थरूर यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. मात्र, शशी थरूर न्यायालयाच्या परवानगीशिवाय देशाबाहेरही जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

Web Title: Rahul Sonia Gandhi too Belawale says Subramaniam Swamy