नववर्षाच्या शुभेच्छा देत राहुल प्रवासाला रवाना

वृत्तसंस्था
शनिवार, 31 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी प्रवासाला रवाना झाले आहेत.

राहुल गांधी यांनी ट्‌विटरद्वारे म्हटले आहे की, 'पुढील काही दिवसांसाठी मी प्रवासासाठी जात आहे. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. या नव्या वर्षात तुम्हाला आणि तुमच्या आप्तेष्टांना शुभेच्छा.' राहुल गांधी लंडनला रवाना झाल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करताना गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही प्रश्‍न विचारले आहेत. नोटाबंदीच्या नाट्यमय निर्णयामुळे अनेकांना नोकरी गमवावी लागल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जानेवारीपासून नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. नोटाबंदीचा निर्णय हा स्वातंत्र्यानंतरचा सर्वांत मोठा गैरव्यवहार असून तो समोर आणण्यासाठी देशव्यापी आंदोलन करण्यात येत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. दरम्यान, नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोदी देशवासीयांना संबोधित करणार आहेत. त्यामध्ये ते काही मोठा महत्वाचा निर्णय घोषित करण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Rahul wishes New Year before leaving for holidays