गुणांसाठी शोषणप्रकरणी पोलिसांचे विद्यापीठात छापे

वृत्तसंस्था
शनिवार, 21 एप्रिल 2018

मदुराई/कोईम्बतूर : चांगल्या गुणांसाठी अधिकाऱ्यांशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला देणाऱ्या प्राध्यापिकेचे प्रकरण उघडकीस आल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी सीआयडी अधिकाऱ्यांनी आज मदुराई कामराज विद्यापीठ (एमकेयू) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर छापे घातले. या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून तमिळनाडू उच्च शिक्षण विभागाचे सचिव सुनील पालिवाल यांनी चौकशी समिती स्थापन केल्याचे सांगून या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असे सांगितले.

देवंगा आर्ट कॉलेजमधील हे प्रकरण महिन्यापूर्वीचे आहे. सहायक प्राध्यापिकेचे आणि विद्यार्थ्यांचे टेलिफोनवरील झालेले संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उघड झाले. कॉलेज आणि स्थानिक महिला संघटनांनी तक्रार केल्यानंतर आरोपीची चौकशी झाली. त्यानंतर विरुद्धनगर येथील घरातून त्यांना अटक करण्यात आली. एमकेयू विद्यापीठाचे कुलगुरू पी. पी. चेल्लाथुराई आणि रजिस्ट्रार व्ही. चिनय्या यांच्या कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली. आरोपी सहायक प्राध्यापिका निर्मला देवी सध्या सीआयडी कोठडीत आहेत. त्यांना सत्तूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. कॉलेजचे सचिव रामास्वामी यांनी तीन प्राध्यापकांच्या समितीचा प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. या आधारावर निर्मला देवी यांना निलंबित केले आहे. या मुद्‌द्‌यावर राजकारणही तापले आहे. राज्याचे मंत्री डी. जयाकुमार यांनी आरोपी या प्रकरणातून सुटणार नाहीत, असे स्पष्ट केले. सरकार दोषींवर कडक कारवाई करेल, असे त्यांनी नमूद केले तर द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

Web Title: Raids in Police University in exploitation cases