रेल्वे भरती ; 90 हजार जागांसाठी 3.5 कोटी अर्ज

वृत्तसंस्था
बुधवार, 11 एप्रिल 2018

आतापर्यंत 3 कोटी 50 अर्ज दाखल झाले असून, रेल्वे बोर्डाने यातील 2 कोटी 37 लाख उमेदवारांचे नाव शॉर्टलिस्ट केले आहे. या सर्व उमेदवारांनी अर्ज भरून परीक्षेचे शुल्क भरले आहे. मात्र, यामध्ये अर्जाबाबतचे सर्व नियम आणि अटी अपूर्ण आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आश्विनी लोहानी स्वत: या परीक्षेवर लक्ष देत आहेत.

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेमध्ये मोठी भरती होत आहे. देशातील 90 हजार जागांसाठी ही भरती करण्यात येत आहे. या 90 हजार जागांसाठी तब्बल 3 कोटी 50 लाख अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे पदसंख्या कमी आणि उमेदवारच जास्त ही परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.

RAIL Board

आतापर्यंत 3 कोटी 50 अर्ज दाखल झाले असून, रेल्वे बोर्डाने यातील 2 कोटी 37 लाख उमेदवारांचे नाव शॉर्टलिस्ट केले आहे. या सर्व उमेदवारांनी अर्ज भरून परीक्षेचे शुल्क भरले आहे. मात्र, यामध्ये अर्जाबाबतचे सर्व नियम आणि अटी अपूर्ण आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आश्विनी लोहानी स्वत: या परीक्षेवर लक्ष देत आहेत. ते म्हणाले, ''रेल्वेच्या 90 हजार जागांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत. या उमेदवारांच्या परीक्षेसाठी रेल्वे प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. त्यासाठी ऑनलाईन परीक्षेसाठी सुमारे एक हजार प्रश्न तयार करण्यात आले आहेत. या सर्वांसाठी दोन टप्प्यात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे''. 

पहिल्या टप्प्यासाठीची परीक्षा ऑगस्टमध्ये होईल. मात्र, या दोन्ही परीक्षेचा अंतिम निकाल हा मार्च महिन्यात देण्यात येईल. तसेच याबाबतची घोषणा लवकरच करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

Web Title: Rail Recruitment Three And A Half Million Applications For 90 Thousand Posts Of Railways