नवी दिल्ली : पूर्वनियोजित किंवा अचानक रेल्वे प्रवासाला जाताना सर्वसाधारण (अनारक्षित) तिकीट काढण्यासाठी आता तुम्हाला लांबच लांब रांगांमध्ये उभे राहणे सक्तीचे नसेल. कारण जनरल तिकीटही मोबाईल ऍपद्वारे काढण्याची सुविधा रेल्वेने आता उपलब्ध करून दिली आहे. नोव्हेंबरपासून ही सुविधा मोबाईल ऍपद्वारे सुरू झाल्याची घोषणा रेल्वेने केली.
अर्थात, ही सेवा चार वर्षांपूर्वीच अंशतः सुरू झाली होती. मात्र, ती फक्त उत्तर-मध्य रेल्वे विभागांतील विशिष्ट जागांवरच चालत होती. आता देशभरात ती लागू होईल.
यूटीएस ऍपद्वारे देशातील सारी स्थानके आता जोडली जातील. यूटीएस ऍपमध्ये देशातील साऱ्या स्थानकांची उपलब्धता असेल. घरबसल्या जनरल तिकिटे प्रवासी खरेदी करू शकतील. रेल्वे बोर्डाचे महाव्यवस्थापक एम. सी. चौहान यांनी सांगितले, की हे मोबाईल ऍप निःशुल्क आहे. त्यासाठी त्याच दिवशी तिकीट आरक्षित करावे लागणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.