रेल्वेचा ‘बुलेट' प्रकल्प- २०० किमीच्या वेगाने धावणार १०० रेल्वेगाड्या

रेल्वेला ‘सपुर वेग' मिळण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न सुरू झाले आहेत. २०० किलोमीटर प्रती तास या वेगाने धावणाऱया १०० अत्याधुनिक गाड्या रेल्वेच्या ताफ्यात दाखल
Railway Bullet project 100 trains running at speed of 200 kmph rdso new delhi
Railway Bullet project 100 trains running at speed of 200 kmph rdso new delhisakal

नवी दिल्ली - रेल्वेला ‘सपुर वेग' मिळण्याच्या दृष्टीने ठोस प्रयत्न सुरू झाले आहेत. २०० किलोमीटर प्रती तास या वेगाने धावणाऱया १०० अत्याधुनिक गाड्या रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. भारतीय रेल्वेच्या संशोधन, अभिकल्प व मानक संघटनेने (आरडीएसओ) याबाबतच्या वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. तशा रेल्वेगाड्या सुरू झाल्यावर दिल्ली-मुंबई हा प्रवास फक्त ७ तासांत, दिल्ली-पाटणा ७ तासांत तर दिल्ली-लखनौ अंतराचा प्रवास अक्षरशः अडीच तासांत पूर्ण होणे शक्य होनार आहे. आरडीएसओ चे महासंचालक संजीव भुटानी यांनी याबाबतच्या प्रकलपाची माहिती दिली. सध्या शताब्दी व राजधानी रेल्वेगाड्या सर्वसाधाराण ताशी १३० किमी वेगाने धावतात.

हा वेग २०० पर्यंत नेण्यासाठी सिग्नलिंग, रेल्वे ट्रॅक यासह अन्य तांत्रिक बाबी व मनुष्यबळाचेही आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वेने यापूर्वीच काम सुरू केले आहे. ही सुविधा खरोखरच निर्धारित मुदतीत अवतरली तर भारतीय रेल्वे विमान कंपन्यांना टक्कर देण्याच्या परिस्थितीत येईल. याबाबतचे दिशानिर्देश यापूर्वीच जारी करण्यात आले आहेत. आपत्कालीन स्थितीत २०० किमी प्रती तास इतक्या वेगाने धावणाऱया गाड्यांची टक्कर होऊन भलताच अनावस्था प्रसंग उद्भवू नये यादृष्टीने इंजिन प्रणालीत एक अत्याधुनिक टक्कर विरोधी यंत्रणाही कार्यरत करण्यात येणार आहे. याच वर्षी सध्याच्या रेल्वेगाड्यातं अशी प्रणाली चाचणी तत्वावर बसविण्यात येणार आहे. मार्च २०२२ मध्ये याबाबतचे प्राथमिक परीक्षण पूर्ण करण्यात आले होते. नवीन गाड्या रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील तोवर त्यासाठीची तांत्रिक पूर्वतयारी झाली पाहिजे असेहि निर्देश देण्यात आलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com