रेल्वेकडून भाडेवाढीची शक्‍यता 

वृत्तसंस्था
सोमवार, 12 डिसेंबर 2016

तिकिटावर उपकर येण्याची शक्‍यता 
स्लीपर, सेकंड क्‍लास, एसी-3 या श्रेणीच्या तिकिटांवर जादा उपकर आकारण्यात येणार आहे. एसी-1 आणि एसी-2 या श्रेणीच्या तिकिटांवर मात्र, तो कमी असेल. या प्रस्तावावर विचार सुरू असून, लवकरच यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे. 

नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाने विशेष सुरक्षा निधीचा रेल्वे मंत्रालयाचा प्रस्ताव फेटाळल्याने आर्थिक स्रोतांची उभारणी करण्यासाठी रेल्वेकडून भाडेवाड होण्याची शक्‍यता आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांवर तिकिटांच्या दरवाढीचा बोजा पडणार आहे. 

लोहमार्ग सक्षमीकरण, सिग्नल यंत्रणा अद्ययावत करणे आणि माननविरहित रेल्वे क्रॉसिंग यासह अनेक सुरक्षात्मक उपाययोजनांसाठी रेल्वेने विशेष सुरक्षा निधीचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठविला होता. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून "राष्ट्रीय रेल्वे संरक्षण कोश'साठी 1 हजार 19183 कोटी रुपयांचा निधी मागितला होता. मात्र, अर्थ मंत्रालयाने हा प्रस्ताव फेटाळून रेल्वेने भाडेवाढ करून निधी उभा करावा, अशी सूचना केली. रेल्वेने सुरक्षा निधीसाठी स्वत: 75 टक्के पैसा उभारावा आणि उरलेला 25 टक्के निधी अर्थ विभाग देईल, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता रेल्वेला निधी उभारणीसाठी भाडेवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याचे तज्ज्ञांच मत आहे. 
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे भाडे वाढवावे या मताचे नाहीत. रेल्वेच्या प्रवशांची संख्या कमी होत असून, आधीच एसी-1 आणि एसी-2 श्रेणीची तिकिटे महागडी आहेत. मात्र, अर्थ मंत्रालयाने निधी देण्यास नकार दिल्याने प्रभू यांच्यासमोर सध्यातरी अन्य पर्याय उपलब्ध नाही, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी दिली. 

तिकिटावर उपकर येण्याची शक्‍यता 
स्लीपर, सेकंड क्‍लास, एसी-3 या श्रेणीच्या तिकिटांवर जादा उपकर आकारण्यात येणार आहे. एसी-1 आणि एसी-2 या श्रेणीच्या तिकिटांवर मात्र, तो कमी असेल. या प्रस्तावावर विचार सुरू असून, लवकरच यावर अंतिम निर्णय अपेक्षित आहे. 

अपघातांच्या संख्येतही वाढ 
रेल्वे लोहमार्गावरून घसरण्याच्या घटना सरासरी रोजच घडू लागल्या असून, मागील काही अपघातांमध्ये मोठी जिवितहानीही झाली होती. तज्ज्ञांच्या मते, लोहमार्गांची देखभाल आणि दुरुस्ती होत नसल्याने आणि सिग्नल यंत्रणा अद्ययावत नसल्याने हे घडत आहे. रेल्वेकडून तातडीने याबाबत उपाययोजना सुरू होण्याची गरज आहे.

Web Title: railway to hike tickets