FlashBack 2019 : रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!

टीम ई-सकाळ
Thursday, 26 December 2019

चालू आर्थिक वर्षामध्ये रेल्वेच्या अपघातात कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. रेल्वेच्या शब्दांत याला "झिरो पॅसेंजर डेथ' असे म्हटले जाते.

नवी दिल्ली : फ्लॅशबॅक 2019 भारतीय रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच चालू वर्षात रेल्वेच्या अपघातात कोणत्याही प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला नसल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. भारतीय रेल्वेने केलेल्या दाव्यानुसार आतापर्यंतच्या चालू आर्थिक वर्षामध्ये रेल्वेच्या अपघातात कोणत्याही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. रेल्वेच्या शब्दांत याला "झिरो पॅसेंजर डेथ' असे म्हटले जाते. पीयूष गोयल यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पीयूष गोयल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'सेफ्टी फर्स्ट : 166 वर्षांच्या रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच चालू आर्थिक वर्षात भारतीय रेल्वेच्या अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही.' 'रेल्वेसेवांच्या एकीकरणामुळे त्यांचा दर्जा, कार्यशैली आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया या सर्वांमध्ये महत्त्वाचे बदल होतील. जागतिक दर्जाची रेल्वे सेवा देण्याच्या आमच्या संकल्पाच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे. यामुळे रेल्वेसेवा आणखी चांगली होईल आणि विकासात योगदान देईल,' असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. "झिरो पॅसेंजर डेथ' या संकल्पनेत केवळ रेल्वे दुर्घटना किंवा अपघातात झालेल्या मृत्यूचा विचार केला जातो. इतर कोणत्या कारणामुळे रेल्वे मार्गावर कोणत्या प्रवाशाचा मृत्यू झाला असेल, तर त्याचा यामध्ये समावेश केला जात नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: railway minister piyush goyal shares tweet zero passenger death in 2018-19 financial year