प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेची अद्ययावत यंत्रणा

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 जानेवारी 2017

या अपघातांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, ""या अपघातांमुळे मला दुःख झाले असून, रेल्वे रुळावरून घसरण्याचा रागही आला आहे. अशा घटनांना आम्ही पायबंद घातला पाहिजे, त्यासाठी सुरक्षेबाबतच्या तपासण्या अधिक जागरूकपणे केल्या पाहिजेत. मानवी तपासणीतील दोष टाळण्यासाठी आम्ही या तपासणीसाठी अद्ययावत उपकरणे खरेदी करणे गरजेचे आहे.

नवी दिल्ली - गेल्या दोन महिन्यांत कानपूर येथे रुळावरून घसरून झालेल्या रेल्वे अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मानवी व्यवस्थेवर अवलंबून न राहता आता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर युद्धपातळीवर करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

या अपघातांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, ""या अपघातांमुळे मला दुःख झाले असून, रेल्वे रुळावरून घसरण्याचा रागही आला आहे. अशा घटनांना आम्ही पायबंद घातला पाहिजे, त्यासाठी सुरक्षेबाबतच्या तपासण्या अधिक जागरूकपणे केल्या पाहिजेत. मानवी तपासणीतील दोष टाळण्यासाठी आम्ही या तपासणीसाठी अद्ययावत उपकरणे खरेदी करणे गरजेचे आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयानुसार, रुळांना गेलेले तडे शोधण्यासाठी लवकरच अद्ययावत उपकरणे खरेदी केली जातील. विद्यमान यंत्रणेबाबत जपान आणि कोरिया येथील तज्ज्ञ परीक्षण करून मार्गदर्शन करतील. या परीक्षणामध्ये सहभागी होण्याच्या सूचना सर्व रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्‍शन कंपनी (इरकॉन),
रेल्वे इंडिया टेक्‍निकल ऍण्ड इकॉनॉमिक सर्व्हिस (राइट्‌स) अशा संस्थाही सुरक्षेबाबतच्या यंत्रणांची तपासणी करून सुधारणा आणि त्रुटींच्या दुरुस्तीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.''

रेल्वे सुरक्षा निधीबाबत बोलताना प्रभू म्हणाले, ""सुरक्षिततेच्या कामासाठी रेल्वेकडे निधीचा दुष्काळ आहे. अशा निधीच्या तरतुदीसाठी आम्ही अर्थ मंत्रालयास पत्र लिहिले असून, त्यांनी त्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे.''

Web Title: Railway ministry to act against accidents