रेल्वे सेवेबाबत अनिश्‍चितता कायम;प्रवासी वाहतूक नसल्याने उत्पन्न घटले 

Sakal | Friday, 18 December 2020

प्रवासी वाहतुकीमधून रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये ८७ टक्क्यांची घट झाली, असल्याचे रेल्वे खात्याकडून सांगण्यात आले. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

नवी दिल्ली - देशातील रेल्वेसेवा पूर्ववत कधी सुरू होईल याबाबत आताच निश्‍चित भाष्य करता येणार नाही तसेच याची तारीख देखील सांगता येणार नाही. प्रवासी वाहतुकीमधून रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये ८७ टक्क्यांची घट झाली, असल्याचे रेल्वे खात्याकडून सांगण्यात आले. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आणखी वाचा : कोरोनाची लस कधी आणि कोठे मिळणार? आरोग्य मंत्रालयानं दिली उत्तरे

चालू आर्थिक वर्षामध्ये केवळ प्रवासी वाहतुकीतून ४ हजार ६०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. महसूलाचे हे प्रमाण मार्च २०२१ पर्यंत पंधरा हजार कोटी रुपयांपर्यंत वाढणे अपेक्षित आहे. प्रवासी वाहतुकीतून झालेला तोटा भरून काढण्यासाठी मालवाहतुकीचा आधार घेण्यात येईल.

Advertising
Advertising

याबाबतीत रेल्वे मागील वर्षीचा टप्पाही ओलांडण्याची शक्यता आहे. आता डिसेंबर महिन्यापर्यंत रेल्वेने मागील वर्षीच्या तुलनेमध्ये मालवाहतुकीमध्ये ९७ टक्क्यांपर्यंतचे लक्ष्य प्राप्त केले असल्याचे यादव यांनी सांगितले. कोरोनामुळे अनेक गाड्या रद्द झाल्याने मोठे नुकसान झाल्याचे यादव म्हणाले. रेल्वेने मागील वर्षी प्रवासी वाहतुकीच्या माध्यमातून ५३ हजार कोटी रुपये कमावले होते. 

आणखी वाचा : PM मोदींनी शेतकऱ्यांसमोर जोडले हात; म्हणाले, 'तुमच्यासमोर नतमस्तक...

१ हजार ८९  - सध्या सुरू असलेल्या गाड्या 

६० टक्के - कोलकता मेट्रो 

८८ टक्के  - मुंबई उपनगरी 

५० टक्के - चेन्नई उपनगरी 

आणखी वाचा : नाराज नेत्यांना सोनिया गांधी भेटणार; काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीत आणखी काय...

रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, देशातील रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येईल. 
- व्ही.के. यादव, रेल्वेमंडळाचे अध्यक्ष