esakal | थुंकणाऱ्यांसाठी रल्वे दरवर्षी करते 12 हजार कोटी रुपये खर्च
sakal

बोलून बातमी शोधा

spitting

थुंकणाऱ्यांसाठी रल्वे दरवर्षी करते 12 हजार कोटी रुपये खर्च

sakal_logo
By
सुधीर काकडे

कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेल्या महारामारीच्या काळात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदीच्या कठोर तरतुदी असूनही, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालता आलेला नाहीये. इतर समस्यांसारखंच हे सुद्धा एक मोठं आव्हान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण याचं कारण थुंकी आणि त्यामुळं होणारी दुर्गंधी साफ करण्यासाठी रेल्वे विभाग मोठा पैसा खर्च करत असतो.

रेल्वे स्थानकाच्या परिसरात पान, गुटखा आणि तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांच्या थुंकीमुळे होणारी घाण साफ करण्यासाठी दरवर्षी सुमारे 1200 कोटी रुपये खर्च करते. फक्त पैसेच नाही तर मोठ्या प्रमाणात पाणी सुद्धा वापरलं जातं. त्यामुळं आता अशा प्रवाशांना रेल्वे स्थानक परिसरात थुंकण्यापासून परावृत्त करण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. यासाठी रेल्वेच्या पश्चिम, उत्तर आणि मध्य क्षेत्रांनी नागपूरस्थित स्टार्टअप 'इझीस्पिट' या कंपनीशी करार केला असून, त्यानुसार 42 रेल्वे स्थानकांवर पुनर्वापर करण्याजोगे बायोडिग्रेडेबल स्पिटून (स्पिटून) वेंडिंग मशीन बसवले जाणार आहेत. त्यांनी काम सुरू केले आहे. कंपनीने नागपूर आणि औरंगाबाद महानगरपालिकांशीही करार केला आहे.

हेही वाचा: Income Tax अधिकारी चक्रावले! ऑफिसच्या कपाटात सापडले 550 कोटी

पाच ते दहा रुपये असेल किंमत

स्पिगॉट्समध्ये मॅक्रोमोलेक्यूल पल्प तंत्रज्ञान आणि लाळेमध्ये उपस्थित बॅक्टेरिया आणि विषाणूंना पसरू देणार नाही अशी तरतुद केली आहे. तसेच यातील घटक थुंकी शोषून घेते. स्पिगॉट्स 5 ते 10 रुपयांमध्ये उपलब्ध होतील.

हेही वाचा: Income Tax अधिकारी चक्रावले! ऑफिसच्या कपाटात सापडले 550 कोटी

तीन आकारात उपलब्ध होईल

हे स्पिगॉट्स खिशात सहज ठेवता येतात. त्यामुळे प्रवाशांना पाहिजे तेव्हा त्यामध्ये थुंकणे शक्य होईल, तर रेल्वे परिसरात थुंकण्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीला आळा बसेल. 'इझीस्पिट'च्या सह-संस्थापक रितू मल्होत्रा ​​यांनी सांगितले की, तुम्ही ते माती किंवा चिखलात कुठेही फेकू शकता, कारण ते बायोडिग्रेडेबल आहे, त्यात असलेले बियाणे वनस्पती वाढण्यास मदत करतील.

loading image
go to top