देशातल्या कोळसा संकटासंदर्भात रेल्वेचा मोठा निर्णय

कोळश्याच्या संकटामुळे देशातल्या अनेक राज्यांमध्ये भारनियमनाला सुरूवातही झाली आहे.
Railway will invest in startups Innovative Technological Solutions
Railway will invest in startups Innovative Technological Solutionsesakal

देशासमोर सध्या कोळश्याचं संकट आ वासून उभं ठाकलं आहे. अशातच रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना कोळश्याचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेकडून डब्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. उन्हाळ्यामध्ये वीजेची मागणी वाढत आहे मात्र कोळश्याचा साठा कमी होत आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ऊर्जानिर्मिती केंद्रांना कोळसा पुरवण्यासाठी रेल्वे डब्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुरूवातीला या डब्यांची संख्या ३८० होती, मात्र आता ही संख्या प्रतिदिन ४१५ डबे इतकी करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित सर्व मंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे.

Railway will invest in startups Innovative Technological Solutions
राज्यात लवकरच भारनियमन कमी होणार

देशाची ऊर्जेची ७५ टक्के गरज ही कोळश्यावर आधारित औष्णिक ऊर्जा प्रकल्पांद्वारे भागवली जाते. पंजाब, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये कोळश्याच्या टंचाईमुळे भारनियमनाला सुरूवात झाली आहे.

Railway will invest in startups Innovative Technological Solutions
कोळसा उपलब्ध झाला, तरी रेल्वे ट्रॅक उपलब्ध होत नाहीत, राऊतांचं केंद्राकडे बोट

रेल्वे कोळसा पुरवठा करणाऱ्या डब्यांची संख्या प्रतिदिन ४४५ पर्यंत वाढवण्यासाठी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. ऊर्जा निर्मिती केंद्रांना कोळसा पुरवणाऱ्या रेल्वे डब्यांची संख्या एप्रिलच्या सुरूवातीला ३८० डब्यांवर आली होती, जी पूर्वी प्रतिदिन ४०९ इतकी होती. या डब्यांची संख्या वाढवणं कोळश्याच्या साठ्यात वाढ करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com