रेल्वेमध्ये आजपासून जुन्या नोटा हद्दपार

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - रेल्वे तिकिटे, सरकारी बसगाड्या, रेल्वे प्रवासातील जलपान आणि भोजन आदी आणि मेट्रो व उपनगरी रेल्वेगाड्यांच्या तिकीट खरेदीसाठी आता 500 व 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चालणार नसल्याचे सरकारने आज जाहीर केले. नऊ डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून हा निर्णय अमलात येणार आहे.

500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चालविण्याबाबत लोकांना मिळत असलेल्या सवलतींमध्ये दिवसागणिक कपात करण्याचे धोरण सरकारने अवलंबिले आहे. रेल्वे तिकिटे काढणे किंवा सरकारी बसगाड्यांच्या तिकिटांसाठी, रेल्वे प्रवासात गाडीमध्ये जलपान, अल्पोपहार किंवा भोजनखर्चासाठी, उपनगरी(लोकल) किंवा मेट्रो गाड्यांच्या प्रवासासाठी तिकिटे काढण्यासाठी आता या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत.

Web Title: Railway today in exile in the old currency