रेल्वे शौचालयातील पाणी वापरणाऱ्या खाद्यपदार्थ ठेेकेदाराला दंड

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 मे 2018

नवी दिल्ली : रेल्वे प्रशासनाने खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या ठेकेदारांना एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 1 लाख रूपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या व्हिडीओत हे ठेकेदार रेल्वेतील शौचालयातून चहा, कॉफीच्या कॅनमधून पाणी घेऊन बाहेर येताना दिसत आहेत. हे सर्व दक्षिण मध्य रेल्वेत डिसेंबरच्या सुमारास घडले असल्याचे समोर आले.  

या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा, रेल्वेतील विदारक सत्य समोर आले आहे. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने या ठेकेदारांना असे करण्यापासून रोखल्यानंतरही या ठेकेदारांनी त्यास नकार दिला व शौचालयातून पाणी घेणे चालू ठेवले. हा प्रकार चेन्नई सेंट्रल-हैदराबाद चारमीनार एक्सप्रेसमध्ये सिकंदराबाद रेल्वे स्थानकावर निदर्शनास आला. 

या प्रकारानंतर सिकंदराबाद व काझीपेठ रेल्वेस्थानकादरम्यान जे विक्रेते चहा कॉफी विकतात, त्यांची चौकशी होणार आहे. यापुढे असा प्रकार घडल्यास त्या ठेकेदाराला व विक्रेत्याला 1 लाख रूपयांचा दंड होईल, असे रेल्वे प्रशासनाने सर्व ठेकेदारांना सांगितले आहे, अशी माहिती रेल्वेचे जनसंपर्क प्रमुख उमाशंकर कुमार यांनी दिली. तसेच या व्हिडीओमध्ये दिसणारे विक्रेते हे अनधिकृत आहेत. त्यांच्यावर व असे करणाऱ्या बाकी विक्रेत्यांवरही कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले. व असे प्रकार या पुढे घडणार नाहीत याची रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाईल असे आश्वासन दिले.

Web Title: Railways fine vending contractor Rs 1 lakh for toilet water mixed in tea coffee