
- प्रवाशांना नुकसानभरपाई देऊनही रेल्वेला झाला 70 लाखांचा नफा.
नवी दिल्ली : भारताची पहिली खासगी रेल्वे म्हणून तेजस एक्सप्रेस ओळखली जाते. या ट्रेनला पहिल्यांदा लेट झाल्यास प्रवाशांना नुकसानभरपाई दिली जाते. प्रवाशांना नुकसानभरपाई देऊनही रेल्वेला 70 लाखांचा नफा झाला आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
तेजस एक्सप्रेसने ऑक्टोबरमध्ये जवळपास 3.70 कोटींची कमाई केली. यामध्येच रेल्वेला 70 लाखांचा नफा झाला. याबाबतची माहिती भारतीय रेल्वेनेच दिली आहे. 5 ते 28 ऑक्टोबरदरम्यान 21 दिवस रेल्वे चालवण्यात आली. यादरम्यान रेल्वेला प्रतिदिवशी सुमारे 17.50 लाख रुपयांचा नफा झाला.
Video: राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची सत्ता जाते...
सणासुदीच्या दरम्यान या ट्रेनचे सर्व सीट्स पूर्णपणे बुक होत असतात. मात्र, सर्वांत वेगाने धावत असल्याने या ट्रेनला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहे.
लेट झाल्यास मिळते नुकसानभरपाई
तेजस एक्सप्रेस आठवड्यातून 6 दिवस धावते. 80 ते 85 किमी/तास हा तिचा सामान्य वेग आहे. ही ट्रेन पहिल्यांदा लेट झाल्यास प्रवाशांना नुकसानभरपाईही दिली जाते.
पवारांनी धनंजय मुंडेंची 'का' करून दिली काँग्रेसच्या चाणक्याला विशेष ओळख