तिकिटाबरोबरच रेल्वेचे खाद्यपदार्थांचे दरपत्रक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना अनेकदा खाद्यपदार्थ अवाच्या सवा दरांत विकत घ्यावे लागतात. हे टाळण्यासाठी रेल्वेने आता ऑनलाइन तिकिटांच्याच बरोबरीने खाण्यापिण्याच्या पदार्थांचे छापील दरपत्रकही देण्याचा नवा प्रयोग सुरू केला आहे. मात्र, यातील दरांच्या किमती पाहता त्या किमतीमध्ये कोणत्या गाडीत व कोणत्या स्थानकांवर हे पदार्थ मिळतील याचीही माहिती रेल्वेने द्यावी, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटली आहे. राजधानी व शताब्दी गाड्यांमध्ये जेवणाचे जे दर लावले जातात, त्यापेक्षाही हे दर कितीतरी कमी असल्याने त्या प्रवाशांकडून रेल्वे वसूल करते त्या पैशांचे काय, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

नवी दिल्ली - रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना अनेकदा खाद्यपदार्थ अवाच्या सवा दरांत विकत घ्यावे लागतात. हे टाळण्यासाठी रेल्वेने आता ऑनलाइन तिकिटांच्याच बरोबरीने खाण्यापिण्याच्या पदार्थांचे छापील दरपत्रकही देण्याचा नवा प्रयोग सुरू केला आहे. मात्र, यातील दरांच्या किमती पाहता त्या किमतीमध्ये कोणत्या गाडीत व कोणत्या स्थानकांवर हे पदार्थ मिळतील याचीही माहिती रेल्वेने द्यावी, अशी प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटली आहे. राजधानी व शताब्दी गाड्यांमध्ये जेवणाचे जे दर लावले जातात, त्यापेक्षाही हे दर कितीतरी कमी असल्याने त्या प्रवाशांकडून रेल्वे वसूल करते त्या पैशांचे काय, असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

रेल्वेगाड्यांत व स्थानकांवर पाण्याच्या बाटलीपासून अनेक पदार्थ वाढीव किमतीला विकले जातात. यापूर्वी रेल्वेकडे याबाबत तक्रारी आल्यानंतर त्याबाबतचा खुलासा करण्यात आला होता. तरीही खाद्यपदार्थांचे चढे दर असतात, अशा तक्रारी थांबलेल्या नाहीत. अशा वेळी रेल्वेने निश्‍चित केलेले दर काय, हे प्रवाशांना समजावे यासाठी ऑनलाइन तिकिटाबरोबरच दरपत्रकही देण्याचा प्रयोग रेल्वे राबवत आहे. तिकीट आरक्षित केल्यावर त्याची प्रिंट काढली तर हे खाद्यपदार्थ दरपत्रकही छापून येते. "आयआरसीटीसी'ने हा प्रयोग नुकताच सुरू केला आहे. छापलेल्या दरांपेक्षा जास्त पैसे कोणीही मागू नयेत व कोणी ते देऊही नयेत यासाठी दरपत्रकाची ही शक्कल लढविल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

"आयआरसीटीसी'चे दरपत्रक 
- टी बॅगबरोबर चहा किंवा कॉफी ः 7 
रेल नीर व बाटलीबंद पाणी 
- एक लिटर पाण्याची बाटली ः 15 
- अर्धा लिटर पाण्याची बाटली ः 10 
- जनता थाळी किंवा इकॉनमी मिल ः 20 
स्टॅंडर्ड नाश्‍ता 
- व्हेज : ब्रेडबटर किंवा कटलेट ः 30 
- इडली किंवा वडा ः 30 
- नॉनव्हेज ः अंड्याचे ऑम्लेट ः 35 
(सर्व दर रुपयांत) 

 

Web Title: Railways food menu and tariff

टॅग्स