कर्नाटकमध्ये पैशांचा पाऊस

वृत्तसंस्था
रविवार, 22 एप्रिल 2018

'प्राप्तिकर'कडून 4.13 कोटींची रोकड जप्त

नवी दिल्ली : देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये चलनटंचाई निर्माण झाली असताना कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे अक्षरशः पैशांचा पाऊस पडू लागला आहे. प्राप्तिकर विभागाने राज्यभर केलेल्या कारवाईत 4.13 कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून, यामधील 97 टक्के नोटा या दोन हजार आणि पाचशे रुपयांच्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

देशभरातील चलनटंचाईची नेमकी कारणे शोधून काढण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर विभागासाठी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. कर्नाटक निवडणुकीचा प्रचार आता कोठे रंगात आला आहे. बंगळूरमधील तपास पथकाने आतानपर्यंत 4.13 कोटी रुपयांची रोकड आणि 4.52 किलोग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले असून, त्याचे बाजारातील मूल्य 1.32 कोटी रुपये एवढे आहे. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या रकमेत दोन हजार आणि पाचशे रुपये या उच्च मूल्यांकन असलेल्या नोटांचाही समावेश आहे. निवडणूक आयोगाने 27 मार्च रोजी कर्नाटकमधील निवडणुकीची घोषणा केल्यानंतर प्राप्तिकर विभागाने कारवाईला सुरवात केली होती. प्राप्तिकर विभागाने बंगळूरमधून 2.47 कोटी रुपयांची, तर बळ्ळारीमधून 55 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

कडेकोट बंदोबस्त
काही अर्थतज्ज्ञांनी देशाच्या अन्य राज्यांमधील चलनटंचाईचा संदर्भ हा कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीशी जोडला आहे. कर्नाटक आणि गोव्यातील प्राप्तिकरची तपासपथके बेकायदा आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून असून, यासाठी विमानतळे आणि रेल्वेस्थानकांवर देखील कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: Rainfall in Karnataka 4.13 crore cash seized