पाच नक्षलवादी छत्तीसगडमध्ये शरण

वृत्तसंस्था
शनिवार, 16 डिसेंबर 2017

रायपूर: छत्तीसगडमधील कोंडागाव जिल्ह्यात पाच नक्षलवादी पोलिसांना शरण आले. यात एका महिलेचा समावेश आहे. हिंसक चळवळीतून भ्रमनिरास झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले.

पोलिस जिल्हा मुख्यालयात या नक्षलवाद्यांनी काल शरणागती पत्करली, अशी माहिती कोंडागावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेश्‍वर नाग यांनी दूरध्वनीवर दिली. नक्षलवादी चळवळीच्या फोल विचारसरणीमुळे भ्रमनिरास झाल्याचे सांगून शरणार्थींसाठी राज्याने राबविलेल्या पुनर्वसन योजनेमुळे ते प्रभावित झाल्याची भावना नक्षलवाद्यांनी व्यक्त केली, असे नाग यांनी म्हटले आहे.

Web Title: raipur news Five Naxalites surrender in Chhattisgarh