esakal | काश्‍मिरींसाठी आवाज उठवू : प्रियांका गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

काश्‍मिरींसाठी आवाज उठवू : प्रियांका गांधी

जम्मू-काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याचे सरकारचे कृत्य घटनाबाह्य आणि लोकशाहीविरोधी असून, काश्‍मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती साधारण नाही. 

- डी. राजा, सरचिटणीस भाकप 

काश्‍मिरींसाठी आवाज उठवू : प्रियांका गांधी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीरच्या मुद्यावरून कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज पुन्हा केंद्र सरकारवर टीकेचे प्रहार केले. विरोधक काश्‍मीर समस्येचे राजकारण करत असल्याचा आरोप सरकार करत आहे; पण काश्‍मीरला लोकशाहीने दिलेले हक्क हिरावून घेण्याएवढे राजकीय आणि देशविरोधी कृत्य कोणतेच नसल्याचा घणाघात त्यांनी केला. कितीही दबाव आला तरीसुद्धा कॉंग्रेस पक्ष काश्‍मिरींसाठी आवाज उठवतच राहील, असा निर्धारही त्यांनी ट्‌विटच्या माध्यमातून व्यक्त केला. 

तत्पूर्वी जम्मू - काश्‍मीरमधील स्थिती जाणून घेण्यासाठी श्रीनगरला गेलेल्या विरोधकांच्या शिष्टमंडळाला शनिवारी रिकाम्या हातानेच दिल्लीला परतावे लागले होते. सुरक्षा दलांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण पुढे करत विरोधी नेत्यांना तेथील जनता आणि सुरक्षा दलांशी संवाद साधण्यास मज्जाव करण्यात आला होता. या शिष्टमंडळामध्ये कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचाही समावेश होता. प्रियांका यांनी आज त्यांच्या ट्‌विटसोबत एक राहुल यांचा एक व्हिडिओदेखील शेअर केला असून, यामध्ये एक काश्‍मिरी महिला त्यांना तिच्या कुटुंबीयांना सध्या कोणत्या अग्निदिव्याला सामोरे जावे लागत आहे याची व्यथा मांडताना दिसून येते. 

आणखी किती काळ हे सुरू राहणार? राष्ट्रवादाच्या नावाखाली लाखो लोकांचा आवाज दडपला जात आहे. आता प्रत्येक व्यक्तीचे हे कर्तव्य आहे की, तिने या दडपशाहीविरोधात आवाज उठवावा. आम्ही मात्र कोणत्याही परिस्थितीत काश्‍मिरींचे म्हणणे मांडणे सोडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

loading image
go to top