राज कपूर यांच्या कन्या रितू नंदांचे निधन

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

'रितू नंदा यांच मंगळवारी निधन झालं. त्या कर्करोगामुळे आजारी होत्या. त्यांचे सर्व कुटूंब दिल्लीत आहे. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.' अशी माहिती रितू यांचे बंधू ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी दिली. 

मुंबई : कपूर कुटूंबातील भगिनी व राज कपूर यांच्या कन्या रितू कपूर (वय 71) यांचे आज निधन झाले. मागील काही वर्षांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. आज त्यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार केले जातील.

Image result for ritu nanda

रितू नंदा या अमिताभ बच्चन यांच्या कन्या श्वेता यांच्या सासू होत्या, तर राज कपूर यांच्या कन्या होत्या. 'रितू नंदा यांच मंगळवारी निधन झालं. त्या कर्करोगामुळे आजारी होत्या. त्यांचे सर्व कुटूंब दिल्लीत आहे. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील.' अशी माहिती रितू यांचे बंधू ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नितू कपूर यांनीही सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत रितू यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

My dearest may your soul Rest In Peace

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

रितू यांचा उद्योजक राजन नंदा यांच्याशी विवाह झाला होता. त्या स्वतःही यशस्वी उद्योजिका होत्या. तर मुलगा निखील नंदा यांच्या पत्नी अमिताभ यांची मुलगी श्वेता या आहेत. रितू या अमिताभ यांच्या विहिण असून कपूर घराण्यातील मोठ्या भगिनी होत्या.    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Kapoor s daughter Ritu Nanda Passed away