esakal | राज कुंद्रा प्रकरण: भारतात पॉर्न पाहणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?
sakal

बोलून बातमी शोधा

 53 crimes in porn video cases in the Nagpur

राज कुंद्रा प्रकरण: भारतात पॉर्न पाहणं गुन्हा आहे का? कायदा काय सांगतो?

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेमुळे (Raj Kundra arrest) भारतातील पॉर्नोग्राफी कंटेटबद्दलचा (pornography content) कायद्याचा विषय चर्चेत आला आहे. भारतातील पॉर्नोग्राफी कंटेटबद्दलचे कायदे काय सांगतात? ते समजून घेऊया. पॉर्नोग्राफी कंटेटची निर्मिती केल्याबद्दल राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. एका मॉडेलचा व्हिडिओ (model video) रिलीज झाल्यानंतर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी (Mumbai police) गुन्हा नोंदवला होता. त्या प्रकरणात राज कुंद्राला अटक झाली आहे. (Raj Kundra case what indian laws about pornography content dmp82)

या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली होती. त्याने दिलेल्या माहितीवरुन मुंबई पोलिसांचे हात राज कुंद्रापर्यंत पोहोचले. भारतात पॉर्नोग्राफीशी संबंधित मुख्य कायद्यातील आयपीसीची २९२, २९३ आणि २९४ ही कलमं लागू होतात. हा कायदा १८६० साली बनवण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७ अ नुसार सुद्धा पॉर्नोग्राफी गुन्हा ठरते.

हेही वाचा: Hotshots बंद झाल्यानंतरही राज कुंद्राकडे होता 'प्लान बी'

भारतीय कायद्यानुसार पॉर्नोग्राफीक किंवा अश्लील कंटेट पाहणे किंवा वाचणे हा गुन्हा ठरत नाही. पण असा कंटेट बनवणे, त्याचे वितरण इत्यादी गोष्टी गुन्ह्यामध्ये मोडतात. राज कुंद्रावर नेमके हेच आरोप आहेत.

हेही वाचा: ठाणे: "लेडीज बार तुडुंब भरून कोणाच्या आशीर्वादाने सुरू होते?"

IPC च्या कलम २९२ नुसार, पॉर्नोग्राफीक कंटेट बनवणं आणि त्याचं वितरण हा गुन्हा ठरतो. पहिल्यांदा दोषी ठरल्यास तीन वर्ष कारावास आणि दुसऱ्यांदा दोषी ठरल्यास पाच वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

IPC चं कलम २९३ तरुणाईशी खासकरुन २० वर्षाखालील वयोगटाशी संबंधित आहे. यामध्ये पॉर्नची निर्मिती, विक्री आणि प्रसाराचा विषय येतो.

सार्वजनिक ठिकाणी कृतीतून किंवा गाण्यामधून अश्लीलता प्रदर्शित करण्याचा विषय कलम २९४ मध्ये येतो. सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी म्हणणं आणि शब्द उच्चारणं गुन्हा ठरतो.

राज कुंद्राने केलेला गुन्हा या आयपीसी सेक्शनमध्ये मोडतो. अश्लील कंटेट बनवणं आणि मोबाइल फोन अ‍ॅपच्या माध्यमातून असा कंटेट लोकांमध्ये घेऊन जाणं, गुन्हा ठरतो.

loading image