esakal | 'प्रांतिक अस्मितेचं राजकारण पुढे न्याल'; राज ठाकरेंच्या स्टालिन यांना सदिच्छा

बोलून बातमी शोधा

'प्रांतिक अस्मितेचं राजकारण पुढे न्याल'; राज ठाकरेंच्या स्टालिन यांना सदिच्छा
'प्रांतिक अस्मितेचं राजकारण पुढे न्याल'; राज ठाकरेंच्या स्टालिन यांना सदिच्छा
sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : सध्या पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूमध्ये द्रमुक या पक्षाची सत्ता स्थापन होण्याचं चित्र दिसून येत आहे याठिकाणी द्रमुकने 118 जागांची मॅजिक फिगर पार केली आहे. सध्या द्रमुक 119 जागांवर आघाडीवर आहे. द्रमुकचा सहकारी पक्ष काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. दोन्ही पक्षांच्या आघाडीने सध्या राज्यात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला आहे.एकूण 140 हून अधिक जागांवर द्रमुक आघाडी पुढे आहे. तर सत्ताधारी असणारा अण्णा द्रमुक 84 जागांवर पुढे आहे. त्यामुळे या निवडणुकीत अण्णा द्रमुकचा पराभव झाला आहे. याबाबत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी द्रमुकचे प्रमुख एम के स्टालिन यांचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा: Live : तमिळनाडूत द्रमुकची सत्ता

त्यांनी म्हटंलय की, तमिळनाडू विधानसभेत स्टॅलिन ह्यांच्या नेतृत्वाखाली डीएमके पक्षाने मिळवलेल्या विजयासाठी, स्टॅलिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच मनापासून अभिनंदन. भाषिक आणि प्रांतिक अस्मितेच्या राजकारणाला करुणानिधींनी कायमच प्राधान्य दिलं, हीच भूमिका तुम्ही देखील तितक्याच निष्ठेने पुढे न्याल आणि काही बाबतीत राज्यांच्या स्वायत्ततेबद्दल आग्रही रहाल अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन.

हेही वाचा: Live: ममतादीदीच 'किंग'; सुवेंदूंचा पराभव

तमिळनाडूमध्ये 234 जागांसाठी विधानसभेची निवडणूक झाली. आज तब्बल 4,218 उमेदवारांचं भविष्य निश्चित होत आहे. राज्यात सत्ता गाठण्यासाठी 118 जागांचा टप्पा गाठणे महत्त्वाचं होतं. एम करुणानिधी आणि माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर होणारी ही पहिलीच विधानसभेची निवडणूक आहे. अण्णा द्रमुक (AIADMK) आणि द्रमुक (DMK) हे या ठिकाणी लढणारे प्रमुख पक्ष आहेत. सहा एप्रिल रोजी राज्यात एकाच टप्प्यात पार पडलेल्या मतदानात तब्बल 72.78 टक्के मतदारांनी मतदान केलं आहे.