ए. राजा, कनिमोळींविरुद्ध "ईडी' उच्च न्यायालयात

वृत्तसंस्था
सोमवार, 19 मार्च 2018

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टू जी स्पेक्‍ट्रम प्रकरणातील मुख्य आरोपी ए. राजा आणि कनिमोळी यांच्यासह सुमारे 19 लोकांना दोषमुक्त केले होते. त्याच वेळी "ईडी'ने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे म्हटले होते

नवी दिल्ली - कोट्यवधी रुपयांच्या टू जी स्पेक्‍ट्रम गैरव्यवहार प्रकरणी माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि द्रमुकच्या खासदार कनिमोळी यांना निर्दोष ठरविण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले.

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये टू जी स्पेक्‍ट्रम प्रकरणातील मुख्य आरोपी ए. राजा आणि कनिमोळी यांच्यासह सुमारे 19 लोकांना दोषमुक्त केले होते. त्याच वेळी "ईडी'ने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे म्हटले होते.    

Web Title: a raja enforcement directorate court