माध्यमांच्या जगात राजा राम मोहन रॉय यांचे योगदान मोलाचे

वृत्तसंस्था
बुधवार, 22 मे 2019

रॉय यांनी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आणि त्या बदलांना अनुकूल राजकीय वातावरण तयार करण्यासाठी सर्वप्रथम वर्तमानपत्र या माध्यमाचा वापर केला. स्त्री-वादी समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख सर्वज्ञात आहेच. त्याचबरोबर 'भारतीय पत्रकारितेचे अर्ध्वयु' म्हणूनही इतिहासात त्यांची नोंद आहे. 

कोलकता : राजा राम मोहन रॉय हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी १८२४ मध्ये माध्यमांच्या स्वातंत्र्यावर अंकुश आणण्याला विरोध नोंदविला होता. त्याचबरोबर 'भारतीय पत्रकारितेचे अर्ध्वयु' म्हणूनही इतिहासात त्यांची नोंद आहे. 

रॉय यांनी सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी आणि त्या बदलांना अनुकूल राजकीय वातावरण तयार करण्यासाठी सर्वप्रथम वर्तमानपत्र या माध्यमाचा वापर केला. स्त्री-वादी समाजसुधारक म्हणून त्यांची ओळख सर्वज्ञात आहेच.

सामाजिक सुधारणा आणि राजकीय मत निर्मितीमध्ये माध्यमांचे महत्त्व रॉय यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात ओळखले होते. काळानुसार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक बदल झाले. मुद्रित माध्यमांसोबत नव माध्यमे, समाज माध्यमे अधिक रूढ होत असताना माध्यमांचा मूळ उद्देश मात्र आजही कायम आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raja Ram Mohan Roy birth anniversary