चाहत्यांचा जल्लोषात रजनीकांतच्या 'काला'चे स्वागत

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

रजनीकांतच्या कालासाठी चित्रपटगृह भव्य पोस्टर आणि होर्डिंगसह सज्ज झाले आहेत आणि आज जगभर रजनीकांतच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट कुठल्याही महोत्सवापेक्षा कमी नाही.​

चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांचा खूप दिवसांच्या प्रतिक्षेनंतर चंदेरी दुनियेत 'काला'च्या निमित्ताने पुन्हा पदार्पण झाले. त्यामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली होती. चाहत्यांचे जल्लोषाचे, फटाके फोडण्याचे, आणि त्यातून आपल्या सुपरस्टारचे ट्रेंडी स्वागत करणारे व्हिडिओज् इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. 

 kaala rajinikanth

बऱ्याच वेळा रजनीकांतच्या चित्रपटाच्या वेळी जपान आणि देशातील इतर भागांतील लोक भारतीय चाहत्यांमध्ये सहभागी झाले होते. 'काला'च्या निमित्ताने एकत्र येऊन सेलिब्रेट करण्याची संधी मिळत आहे, ज्यात 'थलैवा' हा शब्द आकर्षण ठरत आहे. तमिळमध्ये थलैवा बॉस किंवा मुख्य या अर्थी वापरला जातो आणि तमिळ चित्रपटसृष्टीत रजनिकांतला प्रेमाने थलैवा या नावाने संबोधते.  

रजनीकांतच्या कालासाठी चित्रपटगृह भव्य पोस्टर आणि होर्डिंगसह सज्ज झाले आहेत आणि आज जगभर रजनीकांतच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट कुठल्याही महोत्सवापेक्षा कमी नाही. या जल्लोषाचे प्रतिबिंब गुरुवारी (ता. 7) सकाळी 4.15 वाजता चेन्नईतील थिएटरच्या बाहेर चाहत्यांच्या मोठ्या गर्दीत दिसून आले. रजनीकांतसाठी चाहते चियर करत जयघोष करत होते. काही चाहत्यांनी हा जल्लोष 'काला' या टंकात लिहिलेले टी-शर्ट परिधान करुन केला. तर सोशल मिडियाच्या जमान्यात #kaala, #kaalatheRageofRajinikanth, #onceAkingalwaysaking अशा हॅशटॅग्जमधून चाहत्यांनी आपला आनंद शेअर करण्यात कुठलीच कमी ठेवली नाही. 

त्यामुळे 'काला'ने चित्रपट प्रदर्शनापुर्वीच 230 कोटींचा व्यवसाय केला, ही आश्चर्याची बाब ठरणार नव्हती. जर या चित्रपटाने अजुन 280 कोटींची कमाई केली तर 2018च्या व्यावसायिक हिट फिल्मच्या यादीत 'काला'चे स्थान निश्चित होईल. दरम्यान, कावेरी संदर्भातील रजनीकांत यांच्या अपमानास्पद विधानामुळे कर्नाटकातील 'काला'वर करण्यात आलेल्या बंदीचा चित्रपट प्रदर्शनावर विशेष परिणाम झाला नाही. याशिवाय कर्नाटकात चित्रपट प्रदर्शनासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मंजुरी देण्यात आली. तरीही प्रो-कन्नड गटांनी राज्यात स्क्रिनींग टाळण्याच्या धमक्या दिल्या होत्या.

मुंबईच्या विस्तीर्ण झोपडपट्टी जनजीवनावर आधारित 'काला' चित्रपट आहे. चित्रपट रजनीकांतपेक्षा रणनितीवर लक्ष केंद्रीत करणारा आहे. पै. रणजीत यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात नाना पाटेकर आणि हुमा कुरेशी यांचाही समावेश आहे. 'काला' हा रजनीकांतचे जावई धनुष यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.  

Web Title: rajanikanth s kala in cinema theater fans enthusiastically welcomed