संतापजनक! जमिनीच्या वादातून महिलांवर अत्याचार; डोळ्यात, गुप्तांगात टाकली मिरची पावडर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan Crime News

महिलांवरील अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीये.

संतापजनक! जमिनीच्या वादातून महिलांवर अत्याचार; डोळ्यात, गुप्तांगात टाकली मिरची पावडर

कोटा : राजस्थानमध्ये महिलांवरील (Rajasthan Women) अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाहीये. राजस्थानच्या कोटा विभागात एक नवीन प्रकरण समोर आलंय. इथं 2 महिलांवर अत्याचार करून त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकण्यात आलीय. त्याचवेळी महिलांच्या गुप्तांगामध्ये मिरची पूड टाकली आहे.

मात्र, पोलिसांनी प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकल्याचा आरोप फेटाळून लावलाय. जखमी महिलांना कोटा मुख्यालयातील एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाहीये.

हेही वाचा: Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटामधील कैथून पोलीस स्टेशन हद्दीतील चरणहेडी गावात हे हृदयद्रावक प्रकरण समोर आलंय. इथं जमिनीच्या वादातून दोन महिलांवर अत्याचार करण्यात आला आहे. महिलांच्या अंगावर जखमेच्या खुणा आहेत. महिलांचा भाऊ धनराजनं सांगितलं की, 'कुटुंबातील सदस्यांनी बहिणींना शेतात मारहाण केली. दीदीच्या डोळ्यात आणि गुप्तांगात लाल मिरची टाकण्यात आली. मेव्हण्याला काठ्या, दांडक्यानं मारहाण करण्यात आली. मेव्हणीच्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे.' याबाबतचा अधिक तपास पोलिस करत आहेत.