आता दारु महागणार !

वृत्तसंस्था
सोमवार, 11 जून 2018

राज्यामध्ये आता दारु महागणार आहे, कारण; वसुंधरा सरकार आता दारुवर 'काउ सेस' लावणार आहे. केंद्र सरकारकडून गौशाळांसाठी मिळणारे अनुदान बंद झाल्याने ही भरपाई करण्यासाठी वसुंधरा सरकारने हा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. 

राजस्थान - राज्यामध्ये आता दारु महागणार आहे, कारण; वसुंधरा सरकार आता दारुवर 'काउ सेस' लावणार आहे. केंद्र सरकारकडून गौशाळांसाठी मिळणारे अनुदान बंद झाल्याने ही भरपाई करण्यासाठी वसुंधरा सरकारने हा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे देशात राजस्थान हे एकमेव राज्य असे आहे की, त्यांनी गायींसाठी वेगळ्या मंत्रालयाची स्थापना केली आहे. दारुवर कर लावण्याआधी गेल्यावर्षी वसुंधरा सरकारने स्टँपवर कर लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीही सरकारने गायीच्या संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.

सरकारच्या म्हणण्यानुसार, राज्यातील गोशाळेत जवळपास 5 लांखापेक्षा जास्त गायींची संख्या आहे. त्यांच्या संरक्षणासाठी सरकारला जवळपास 200 ते 250 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: rajasthan announces cow cess 10 surcharge on stamp duty for cow protection