भाजप नेत्याने राहुल गांधींना म्हटले औरंगजेब

वृत्तसंस्था
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

जयपूरः औरंगजेब हे मुगलांचे शेवटचे बादशहा होते, त्याप्रमाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे शेवटचे बादशहा ठरणार आहेत. राहलु गांधी हे औरंगजेब प्रमाणे असून, काँग्रसेचा शेवट निश्चित आहे, असे भारतीय जनता पक्षाचे नेते ज्ञानदेव आहुजा यांनी म्हटले आहे.

आहुजा हे राजस्थान भाजपचे उपाध्यक्ष असून, वादग्रस्त वक्तव्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना आहुजा म्हणाले, 'अल्वरमधील रामगढ विधानसभा पोटनिवडणूक ही भाजपच जिंकेल. काँग्रेस गोमातेवरून ढोंग करत आहे. राहुल गांधी हे औरंगजेबसारखे असून, काँग्रेसचा शेवट निश्चित आहे.'

आहुजा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नटिझन्स प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Web Title: Rajasthan BJP leader compares Rahul Gandhi with Aurangzeb, says Gyan Dev Ahuja