Rajasthan Congress Crisis : सचिन पायलट सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajasthan, PoliticalCrisis, Sachin Pilot,Congress

Rajasthan Congress Crisis : सचिन पायलट सोनिया गांधींना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल

नवी दिल्ली : राजस्थान काँग्रेसच्या प्रचंड गदारोळ सुरू असताना पक्षाचे नेते सचिन पायलट पक्षप्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. सूत्रांनी सांगितले की, पायलट यांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे, ती अद्याप देण्यात आलेली नाही. (rajasthan congress crisis news in Marathi)

हेही वाचा: Eknath Shinde : निवडणूक आयोगातील लढाई शिंदेच जिंकणार; बाळासाहेबांच्या नातवाला विश्वास

सूत्रांनी सांगितले की, अद्याप बैठक निश्चित झाली नाही. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यानंतर सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीला 90 हून अधिक आमदारांचा विरोध आहे. सर्व आमदारांनी सामूहिक राजीनामे देण्याची धमकी दिली आहे.

या व्यतिरिक्त अशोक गेहलोत हे देखील दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. राजस्थान काँग्रेसमधील गदारोळाबाबत पक्षाच्या निरीक्षकांनी मंगळवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना अहवाल सादर केला आहे. तसेच आमदारांनी स्वतंत्र बैठक घेऊन पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका निरीक्षकांनी ठेवला आहे.

महेश जोशी यांच्याशिवाय कॅबिनेट मंत्री शांती धारिवाल आणि आमदार धर्मेंद्र राठोड यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हे तिन्ही नेते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जातात.